Walking Difficulty and Lumbar Stenosis / चालण्यातील अडचण आणि लंबर स्टेनोसिस
English
Explain what stops you walking and what helps you recover.
Describe the limitation
Do your legs hurt, feel heavy, become numb or feel weak when you walk? How far can you usually go? What happens when you stop, sit or change position? These are helpful observations to share.
Understanding the term stenosis
Lumbar stenosis means narrowing around nerves in the lower spine. An imaging description must be considered alongside your symptoms and examination before deciding what it means for you.
Keep the assessment broad
Walking difficulty can have more than one contributor. A consultation may need to consider joint problems, circulation, nerve function and your general health as well as the spine.
Focus on a meaningful goal
Bring an example of the walking you would like to do: reaching a nearby shop, visiting family or moving around your home. Ask which options could help, what improvement is realistic and how progress will be reviewed.
मराठी
चालताना कशामुळे थांबावे लागते आणि कशाने आराम मिळतो, ते सांगा.
अडचणीचे वर्णन करा
चालताना पाय दुखतात, जड होतात, बधिर होतात की शक्ती कमी वाटते? साधारण किती अंतर चालता येते? थांबल्यावर, बसल्यावर किंवा शरीराची स्थिती बदलल्यावर काय होते? ही निरीक्षणे सांगा.
स्टेनोसिस म्हणजे काय?
लंबर स्टेनोसिस म्हणजे कंबरेतील मज्जातंतूंच्या आसपासची जागा अरुंद होणे. स्कॅनमधील वर्णनाचा अर्थ लावताना लक्षणे आणि तपासणी यांचाही विचार करावा लागतो.
इतर कारणांचाही विचार करा
चालण्यात अडचण येण्याची एकापेक्षा अधिक कारणे असू शकतात. मणक्याबरोबर सांधे, रक्ताभिसरण, मज्जातंतूंचे कार्य आणि एकूण आरोग्य तपासण्याची गरज पडू शकते.
आपले उद्दिष्ट ठरवा
जवळच्या दुकानापर्यंत जाणे, नातेवाइकांना भेटणे किंवा घरात फिरणे यांपैकी कोणते काम सुधारावेसे वाटते, ते सांगा. योग्य पर्याय, अपेक्षित सुधारणा आणि पुढील आढावा यांविषयी विचारा.