Knee Pain / गुडघेदुखी

English

Knee pain should be assessed on its own merits.

Start with the knee and the whole symptom pattern

Pain, swelling, stiffness, locking or giving way are useful details to report. Tell your clinician about an injury, any previous knee treatment and symptoms elsewhere in the leg or back.

Avoid assuming the source

A painful knee does not automatically mean that the spine is responsible. Assessment should consider the knee itself and whether another source needs investigation.

Bring useful information

Note whether stairs, getting out of a chair, walking or rest changes the pain. Bring existing knee and spine investigations if available, along with your medicine list.

When to seek prompt care

A very painful, swollen or deformed knee, inability to bear weight, or a hot red knee with fever needs urgent medical advice. Do not wait for a routine spine appointment.

मराठी

गुडघेदुखीचे स्वतंत्रपणे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

गुडघा आणि इतर लक्षणे सांगा

वेदना, सूज, आखडणे, गुडघा अडकणे किंवा तोल जाणे यांविषयी सांगा. दुखापत, पूर्वीचे उपचार आणि कंबर किंवा पायातील इतर लक्षणांची माहिती द्या.

कारण गृहीत धरू नका

गुडघा दुखतो म्हणजे मणक्याचा त्रास आहे असे आपोआप ठरत नाही. गुडघ्याची तपासणी आणि दुसऱ्या कारणाचा शोध घेण्याची गरज विचारात घ्यावी लागते.

उपयुक्त माहिती आणा

जिने चढणे, खुर्चीतून उठणे, चालणे किंवा विश्रांती यांमुळे वेदना बदलते का, ते नोंदवा. उपलब्ध गुडघा व मणक्याचे रिपोर्ट आणि औषधांची यादी आणा.

त्वरित मदत कधी घ्यावी?

अतिशय दुखणारा, सुजलेला किंवा आकार बदललेला गुडघा, पायावर वजन देता न येणे, किंवा तापासह गरम व लाल गुडघा असल्यास तातडीचा वैद्यकीय सल्ला घ्या. नियमित भेटीची वाट पाहू नका.